जल व्यवस्थापन:- गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून जिल्हा परिषद च्या माध्यमातून एक जल कुंभाला पाण्याचं फिल्टर बसवण्यात आलेला आहे, त्या फिल्टरचं नियमित व्यवस्थापन केलं जातं . तसेच आता 15व्या वित्त आयोग पंचायत समिती स्तर या निधी मधून 7.50 लाखाचं RO वॉटरचा प्लांट मंजूर करण्यात आलेला आहे. व हे शुद्ध पाणी QR कोडने स्कॅन करून लोकांना उपलब्ध केलं जाईल आणि या जलशुद्धीकरण यंत्रामधून बाहेर पडणार जे वेस्टेज पाणी आहे, ते एका हॅन्ड पंपाजवळ 10 × 10 miter by 10 × 10 मीटरचा एक शोषखड्डा तयार करून हे पाणी त्या शोष खड्ड्यांमध्ये सोडलं जाईल, जेणेकरून जल पुनर्भरण होऊन तो हॅन्ड पंप जिवंत होऊन बारमाही पाणी नागरिकांसाठी उपलब्ध होईल. येणाऱ्या काळात श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेची करार करून वाडी शिवारात जलतारा प्रकल्प राबवण्याची संकल्पना असून गावात जलसंधारण व्हावं हा उद्देश आहे.सांडपाणी व्यवस्थापना साठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व्हावं म्हणून गावातल्या पाण्याचा निचरा ज्या दिशेला होतो त्या दिशेला 10 × 10 miter by10 × 10 miter चे तीन शोषखड्डे तयार करून पावसाचं वाहणारे पाणी त्या शोष खड्ड्यांमध्ये टाकलं जाणार आहे . तसेच शासकीय इमारतीवरच पाणी हे देखील त्याच शोषखड्ड्यामध्ये सोडण्यात येणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी सध्या गावात प्रायोगिक तत्त्वावर 100 वैयक्तिक शोषखड्डे मनरेगा अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहेत . त्यांचे काम प्रगतीपथावर आहेत. व पुढे पूर्ण गावासाठी शोषखड्डे मंजूर करून वॉटर हार्वेस्टिंग, गावातलं पाणी गावातच ही संकल्पना राबवण्याची इच्छा आहे.


