कार्यालय वेळ: स. 09:45 - सायं 05:45

ग्रामपंचायत वाडी

तालुका :शिंदखेडा , जिल्हा : धुळे

ग्रामपंचायत कार्यालय, वाडी

तालुका :शिंदखेडा , जिल्हा : धुळे

आता ग्रामपंचायतीचे निर्णय, विकास कामे, शासकीय योजना आणि सेवा – सर्व काही एका क्लिकवर!

आमच्याबद्दल

वाडी हे गाव साधारणत: अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थापन करण्यात आले दलपतसिंग हिंमतसिंह गिरासे ( दलपत दाजी ) रणसिंग दाजी,फकरा दाजी, केसरा दाजी, हिंमता दाजी, गुलाबा दाजी, बहादुर दाजी, रत्ना दाजी, रामसिंग दाजी या महान विभूतीनी या गावाची निर्मिती केली आहे. वाडी हे गाव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात येते .शिंदखेडा तालुक्याला वरदान ठरलेला वाडी-शेवाडी प्रकल्प या गावाच्या नजीक आहे. या प्रकल्पामुळे हे गाव बाधित होऊन नवीन जागेवर पुनर्वसित झालेलं आहे. 21 हेक्‍टर जमिनीवर हे गाव वसलेलं असून अत्यंत सुंदर व सुनियोजित वसलेले गाव आहे. या गावात 1964 साली ग्रामपंचायतची स्थापना झाली. सध्या ग्रामपंचायत “शिक्षण स्वावलंबन आणि पर्यावरण विकास” या त्रिसूत्रीवर काम करताना विविध उपक्रम राबवते आहे. गावातील प्राथमिक शाळा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण अभियान, तसेच महिला बचत गट आणि युवक मंडळांच्या माध्यमातून समाजजागृती करण्यात येते. या उपक्रमांमुळे गावातील लोकांचा सहभाग वाढला असून, विकासाच्या वाटचालीला नवी गती मिळाली आहे. ग्रामपंचायत ने
L &T कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल. व श्री दिगंबर जैन सर्वोउपयोगी धार्मिक न्यास संचलित सहानुभूती हथकरघा प्रशिक्षण केंद्र शिरपूर जैन, जिल्हा वाशिम या संस्थेशी करार करून मुलांना स्वावलंबनासाठी प्रशिक्षणाला पठाण स्वावलंबनासाठी प्रेरित केले जाते. लोकसहभाग आणि एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून वाडी ग्रामपंचायत आज एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून उभी राहिली आहे. गावात स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण आणि आत्मनिर्भरतेला प्राधान्य देत, ग्रामपंचायत “स्वच्छ, सुंदर आणि प्रगतिशील “वाडी गाव” घडविण्याचा संकल्प बाळगून कार्यरत आहे. या सततच्या प्रयत्नांमुळे वाडी गाव विकासाच्या दिशेने ठाम पावले टाकत आहे.

गावाची माहिती

व्यवसाय आणि अर्थव्यवस्था

संस्कृती आणि इतिहास

वाडी हे गाव साधारणत: अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थापन करण्यात आले .या गावातील लोकांनी आपली जमीन आपले घरं वाडी प्रकल्पासाठी समर्पण केली आहेत . गावात सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. गेल्या 30 ते 40 वर्षात एकही भानगड पोलिस स्टेशन पर्यंत गेली नाही. हीच संस्कृती आहे या गावाची. सध्या नवीन जागेवर पुनर्वसित होऊन 17 वर्षे पूर्ण होत आहेत आता पर्यंत 4 सरपंच होऊन गेलेत सुवर्णसिंग गिरासे यांनी 24 डिसेंबर 2023 रोजी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून जबदारी स्वीकारली . शिंदखेडा तालुक्याला वरदान ठरलेला वाडी-शेवाडी प्रकल्प या गावाच्या नजीक आहे. या प्रकल्पामुळे हे गाव बाधित होऊन नवीन जागेवर पुनर्वसित झालेलं असून अत्यंत सुंदर व व्यवस्थित वसलेलं गाव आहे.

दृष्टीकोन

वाडी ग्रामपंचायत सर्वांगीण, शाश्वत आणि समावेशक विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करते. आमचे उद्दिष्ट आहे प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा, सुरक्षितता आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देत स्वच्छ, सक्षम आणि स्वावलंबी गाव घडवणे.

मिशन

वाडी गावाला समृद्ध, स्वच्छ आणि सशक्त बनविणे. शिक्षण, स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण आणि सर्वांगीण विकासातून गावकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे. पारंपारिक संस्कृतीचा सन्मान राखत आधुनिकतेशी समतोल विकास साधणे

ग्रामपंचायत स्थापना

दिनांक :- 07/10/1964

लोकसंख्या

1328 (सन 2011 नुसार)

पुरुष

696

स्त्री

632

कुटुंब संख्या

276

शेतकरी संख्या

221

मतदारांची संख्या

1045

एकूण क्षेत्रफळ

865 हेक्टर

लागवडी योग्य क्षेत्र

309 हेक्टर

बागायत क्षेत्र

156 हेक्टर

स्ट्रीट लाईट पोल

115

अंगणवाडी

1

जिल्हा परिषद शाळा

1

पोस्ट ऑफिस

0

तलाठी ऑफिस

0

आरोग्य उपकेंद्र

0

नळ कनेक्शन

276

सार्वजनिक विहीर

2

महिला बचत गट

14

प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी

198

गावातील प्रमुख पिके

कापूस, केळी, पपई

विविध दाखले मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.


ग्रामपंचायतीचे पदाधिकारी

श्री. सुवर्णसिंग कोमलसिंग गिरासे

लोकनियुक्त सरपंच

श्री. ललित भीमसिंग गिरासे

उपसरपंच

सरकारी योजना

ग्रामपंचायत आपल्या गावातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजना राबविते, ज्यांचा उद्देश सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधणे आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक मदत, रोजगार, आरोग्य सेवा, शिक्षण आणि इतर अनेक सुविधा दिल्या जातात.


ग्रामपंचायत कार्यालयात तुम्हाला उपलब्ध योजनांविषयी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया आणि लाभ घेण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन मिळेल. तुम्ही इच्छित असाल तर येथे ऑनलाइन अर्ज देखील करू शकता किंवा कार्यालयात थेट भेट देऊन मदत घेऊ शकता.

प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वस्त व दर्जेदार घर देण्यासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील गरजूंना घरकुलासाठी अनुदान व कर्ज सवलती दिल्या जातात. घर बांधणीसाठी तांत्रिक मदत आणि आधारभूत सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात. महिलांना घराचे शीर्षक देऊन सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले जाते. पात्र लाभार्थी स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत अर्ज करू शकतात. योजनेमुळे लाखो गरीब कुटुंबांना सुरक्षित आणि समाधानकारक वास्तव्य प्राप्त झाले आहे. या योजनेत पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम पद्धतींचा वापर प्रोत्साहित केला जातो.

₹1,20,000 ते ₹ 2,50,000 मदत

महात्मा गांधी रोजगार योजना ही ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वरोजगारासाठी आर्थिक मदत व तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. यामुळे ते लहान व्यवसाय सुरू करू शकतात आणि आर्थिक स्वावलंबन मिळवू शकतात. योजना अंतर्गत विविध उद्योग व सेवा क्षेत्रात रोजगार निर्मिती होण्यास प्रोत्साहन दिले जाते. पात्र लाभार्थी स्थानिक पंचायत कार्यालयातून अर्ज करू शकतात. ही योजना ग्रामीण विकासाला चालना देण्यास मोठ्या प्रमाणावर मदत करते.

₹220/दिवस

स्वच्छ भारत अभियान ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, जी भारताला स्वच्छ आणि आरोग्यदायी देश बनवण्याचा उद्देश ठेवते. या योजनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, खुल्या ठिकाणी शौचालयांची निर्मिती आणि लोकांमध्ये स्वच्छतेची जाणीव वाढविण्यावर भर दिला जातो. गावं, शहरे आणि शाळांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग प्रोत्साहित केला जातो. स्वच्छ भारतामुळे आरोग्य सुधारते, पर्यावरणाचे रक्षण होते आणि देशाची प्रतिमा उंचावते. या मोहिमेअंतर्गत अनेक स्वच्छता शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक सहभागाचे उपक्रम राबवले जातात.

₹12,000

मिड डे मील योजना ही सरकारद्वारे शाळा विद्यार्थ्यांना दररोज गरम जेवण पुरविण्याचा कार्यक्रम आहे. या योजनेचा उद्देश मुलांचे पौष्टिक आहार सुनिश्चित करणे आणि शाळेच्या उपस्थितीत वाढ करणे हा आहे. यामुळे बालकांचे आरोग्य सुधारते, पोषण वाढते आणि शिक्षणात रस वाढतो. योजना सरकारी व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरली आहे. शाळा प्रशासन आणि स्थानिक संस्था योजनेच्या अंमलबजावणीत सहकार्य करतात. मिड डे मीलमुळे ग्रामीण भागातील मुलांना शाळा सोडण्यापासून प्रतिबंध होतो आणि सामाजिक समावेश वाढतो.

दैनिक

आमच्या सेवा

नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात. प्रत्येक सेवा ही ठरलेल्या प्रक्रियेनुसार, नागरिकांना सहज समजेल अशा पद्धतीने दिली जाते. आमचा उद्देश म्हणजे सर्व सामान्य नागरिकांपर्यंत सुविधा वेळेवर, योग्य व विश्वासार्ह रीतीने पोहोचवणे.

जन्म प्रमाणपत्र

जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र जारी करणे

मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यू नोंदणी आणि प्रमाणपत्र जारी करणे

घर पत्ता प्रमाणपत्र

राहत्या प्रमाणपत्र आणि घर पत्ता जारी करणे

कुटुंब नोंदणी

कुटुंब रेशनकार्ड आणि इतर दस्तऐवज

पाणी पुरवठा

पाणी पुरवठा आणि प्रमाणपत्र जारी करणे

बांधकाम परवाना

बांधकाम परवाना आणि मंजुरी

छायाचित्रे

ग्रामविकास: बातम्या व सुसंवाद

“गावाचा इतिहास — काळाच्या प्रवाहातील अमूल्य ठेवा”

शिक्षक ते गावचा मुखिया सुवर्णसिंग गिरासे ग्रामपंचायत स्थापना 1964 साली झाली. पूर्वीचे वाडी गाव हे वाडी- शेवाडी मध्यम प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेलं आहे. आज गावाची लोकसंख्या 1500 ते 1600 च्या दरम्यान

अधिक वाचा »

वाडी गावचा प्रवास: संघर्षातून समृद्धीकडे

“सरपंच आपल्या दारी ,योजना कल्याणकारी” या उपक्रमांतर्गत गावातील नागरिकांना विविध योजनांची माहिती, कागदपत्रे यांचे वाटप करण्यात. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात.

अधिक वाचा »

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिकावाडी ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विषमुक्त शेती करण्यासाठी सप्त संपादनावर काम सुरू झाले आहे. जल ,जमीन, जंगल, जनावर, जन ( मनुष्य) शिक्षण,स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण

अधिक वाचा »